#

Advertisement

Monday, July 22, 2024, July 22, 2024 WIB
Last Updated 2024-07-22T11:46:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार आणि भाजप नेत्या अमृता पवार एकाच व्यासपीठावर

Advertisement

निफाड : राज्याच्या राजकारणात रोज नव्यानव्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता अजित पवार गटाचे नेते तसेच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार पहायला मिळाला आहे. शरद पवार यांच्या कार्यक्रमात भाजप नेत्या अमृता पवार या व्यासपीठावर उपस्थित होत्या. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
निफाडच्या चितेगाव मध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात भाजपच्या नेत्या अमृता पवार उपस्थित होत्या. यावेळी अमृता पवार यांनी शरद पवार यांचा सत्कार केला. अमृता या येवला मतदातसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अमृता पवार तयारी करत आहेत. अमृता पवार यांनी शरद पवार यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून  सत्कार केल्याने सर्वांचे भुवया उंचावल्या आहेत.
अमृता पवार या नाशिक जिल्हा परिषद सदस्या आणि गोदावरी अर्बन को. ऑप. बॅंकेच्या अध्यक्षा राहिल्या आहेत.  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय म्हणून देखील ओळखल्या जातात.   माजी खासदार वसंतराव पवार तसेच मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक च्या माजी सरचिटणीस, निलीमाताई पवार यांच्या सुकन्या अमृता पवार आहेत.