#

Advertisement

Monday, July 22, 2024, July 22, 2024 WIB
Last Updated 2024-07-22T12:08:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महापालिका, जिल्हा परिषद स्वबळावर लढणार

Advertisement

पुणे :महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर स्वबळावर लढवायच्या आहेत अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं. तसंच कार्यकर्त्यांना व्यवस्थितपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा आपण महायुतीमध्ये एकत्र लढणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वॉर्ड, प्रभाग, गटात व्यवस्थितपणे काम करावं. आपण योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर ते विसरणार नाहीत.