#

Advertisement

Thursday, July 18, 2024, July 18, 2024 WIB
Last Updated 2024-07-18T11:27:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिंदे गटाकडून विधानसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची नेमणूक

Advertisement


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत महत्त्वाची रणनीती आखली जात आहे. शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. शिंदे गटाकडून आज 100 विधानसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभेच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा झाली. शिवसेना महायुतीत किती जागा लढणार? याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. 
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.  या बैठकीला सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित आहेत. आपण 100 विधानसभा लढवूयात, अशी मागणी आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आहे. लोकसभा निवडणुकीत आपला जो स्ट्राईक रेट राहिला आहे त्या हिशोबाने आपण 100 जागा जिंकू शकतो, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. त्यामुळे शिंदे गटाकडून 100 विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रभारींची देखील नेमणूक करण्यात आली आहे. 
सरकारी योजना सगळीकडे प्रसारित करा. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जारी केलेल्या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना केलं. सदस्य नोंदणीवर भर देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडीपदाची देखील नेमणूक करा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.