Advertisement
आगामी विधानसभेला उमेदवारी देणार
पिंपरी : चिंचवडमधील या राजकीय घडामोडींमागे माजी आमदार विलास लांडे यांची व्युहरचना असल्याची चर्चा आहे. कारण पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 14 नगरसेवर अजित पवारांचा गट सोडत आहेत. शरद पवारांच्या भेटीला अजित गव्हाणेंसोबत विलास लांडेंचा मुलगाही आहे. त्यामुळे या सर्व राजकीय खेळीमागे विलास लांडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधानसभेला उमेदवारी देण्यात येणार असल्याने हा राजकीय डावपेच शिजला असल्यांचे बोलले जात आहे, मात्र लांडेंनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना राज्यभरातून अनेक धक्के बसण्याची शक्यता आहे.
यापूर्वी देखील पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राहुल भोसले, समीर मासुळकर, पंकज भालेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीचं वृत्त खरं असल्याचं पवारांनी म्हटलं होते. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र राहावं असं त्यांना वाटतं. आम्ही त्यांचं स्वागत करू असं पवारांनी म्हटल आहे. भेट घेणाऱ्यांमध्ये माझी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडेंचं ही नाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू होती.
