#

Advertisement

Monday, July 15, 2024, July 15, 2024 WIB
Last Updated 2024-07-15T12:10:04Z

महायुतीचे पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असतील !

Advertisement

मुंबई : राज्यात प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी पक्षालाही विधानसभेच्या 288 जागांवरील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्याचा अधिकार आहे. अखेरीस महायुतीमध्ये जे जागावाटप होईल त्यानुसार उमेदवार दिले जातील, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.
पुढील विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत. जसे लोकसभा निवडणूक आम्ही मोदी यांच्या चेहऱ्यावर जिंकली त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवू आणि जिंकू. महायुतीचे पुढील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हेच असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.