Advertisement
सोलापूर : दक्षिण सोलापूर मध्ये मार्ग फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार ह्यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातूनयुवकांची मोठी फळी उभी केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षाकडून त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यांची तठस्थ राहण्याची भूमिका त्यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचे दिसून येते.
दक्षिण सोलापूर मतदार संघात भाजपच्या विद्यमान आमदार व वजनदार नेते असताना देखील झालेली पीछेहाट ही भाजपच्या जिव्हारी लागणारी आहे त्यामुळे भाजप नवीन पर्यायाच्या शोधात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, याच संधीचा फायदा घेत संतोष पवार यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरु केल्याचे समजते, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व भाजपमधील वजनदार नेते गिरीश महाजन यांच्या समवेत त्यांचे अनेक गुप्त बैठक झाल्याचे समजते.वरिष्ठांच्या आदेशावरूनच त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले असल्याचीही चर्चा आहे.
