#

Advertisement

Wednesday, July 3, 2024, July 03, 2024 WIB
Last Updated 2024-07-03T11:45:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राम सातपुते यांनी "शहर मध्य"मधून निवडणूक लढवावी !

Advertisement

भाजप कार्यकर्त्यांकडून मागणी
सोलापूर : आमदार राम सातपुते यांनी आगामी विधानसभा निवडणूक ही शहर मध्य या मतदारसंघातून लढवावी अशी एकमुखी मागणी भाजप कार्यकर्त्यांमधून होत आहे.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आमदार राम सातपुते यांनी शहर मध्य या मतदारसंघात असलेल्या सात रस्ता भागात ऋणानुबंध संवाद मेळावा घेतला, यामध्ये कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली आहे. या मेळाव्यात देवेंद्र कोठे, सुधीर बहिरवाडे, शिवसेनेचे गुंड, माजी नगरसेवक राजकुमार हांचाटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बोलताना सातपुते यांनी पुढील निवडणूक ही शहर मध्य मधून लढावी, लोकसभा निवडणुकीत मध्य मध्ये मिळालेली मते निर्णायक आहेत, आम्हाला हिंदुत्ववादी आमदार हवा आहे त्यासाठी तुम्हीच शहरात हवे अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, फडणवीस साहेब सांगतील त्याठिकाणी मी लढायला तयार आहे, उद्या फडणवीस यांनी राम सातपुते यांना शहर मध्य मधून उमेदवारी दिली तर मी शेजारच्या मतदारसंघातून निवडणूक लढवेन, असे देवेंद्र कोठे यांनी  आपल्या भाषणात जाहीरपणे सांगितल्याने ते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.