Advertisement
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केले स्पष्ट
परभणी : बाबाजानी दुर्राणी यांनी मी साहेबांच्या नेतृत्वाखाली १९८० पासून काम करीत आलो. साहेबांचं चरखा हे पक्षचिन्ह असण्यापासून घड्याळाचं चिन्हं असेपर्यंत मी त्यांच्यासोबत काम केले आहे. मराठवाड्यात फक्त तीन नगरपालिका होत्या. पात्री, पारतूर, उस्मानाबाद या तीन नगरपालिका होत्या. तेव्हापासून पात्रीतील नगरपालिका ही माझ्या नेतृत्वाखालीच आहे. पंचायत समिती, मार्केट कमिटी, जिल्हा परिषदेवरही आम्ही १० वर्षे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परभणी जिल्ह्यात खूप मोठी ताकद आहे. पक्ष फुटला. त्यानंतरही मी दोन महिन्यांनी काही कारणात्सव, काही लोकांच्या सांगण्यावरुन मी सोडून गेलो. पण मी एवढंच सांगेन की शरद पवार साहेबांना सोडून गेलेली अनेक लोक मी माझ्या जीवनात पाहिले, ते पुन्हा विधानभवनाच्या परिसरात दिसले नाही. ते शून्य झाले. बरं झालं साहेब मी शून्य होण्याच्या आधीच आलो, असे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी यांची काल भेट झाली होती. बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी शरद पवार गटाच्या बैठकीत सहभागी झाले. तिथे त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेचं तिकीटही मागितलं होतं. यानंतर आज बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. बाबाजानी दुर्राणी यांनी मंचावर भाषण केले. यावेळी बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांना सोडून गेलेल्यांचं काय होतं, हे स्पष्ट केले.
