Advertisement
तीनपेक्षा जास्त वेळा आमदार असलेल्याना संधी नाही
सोलापूर : भाजपकडून विधानसभा निवडणुकीत गुजरात पॅटर्न राबविला जाण्याची शक्यता आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात तीनपेक्षा जास्त काळ एकच व्यक्ती आमदार असेल त्याची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता दाट आहे. यामुळे नवीन नेतृत्वास संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पार्शवभूमीवर सोलापुर शहर उत्तर विधानसभा मतादरसंघात देखील गेली 20 वर्ष आमदार व मंत्री राहिलेले विजयकुमार देशमुख यांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या ठिकाणी लिंगायत चेहरा म्हणून चन्नवीर चिट्टे यांचे नाव समोर येण्याची दाट शक्यता आहे. वीरशैव लिंगायत मंचच्या माध्यमातून त्यांची राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील सक्रियता ही त्यांच्या जमेची बाजू ठरत आहे.
