#

Advertisement

Monday, July 1, 2024, July 01, 2024 WIB
Last Updated 2024-07-01T13:07:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुण्यातही भाजपची महत्त्वाची बैठक

Advertisement

पुणे :  विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. येत्या 13 आणि 14 जुलै रोजी ही बैठक होणार आहे. स्वत: भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह ही बैठक घेणार आहेत. या दोन दिवसांच्या बैठकीत 13 जुलै रोजी प्रदेश पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना कार्यक्रम दिला जाणार आहे. त्यानंतर 14 जुलै रोजी विस्तारीत कार्यसमितीची बैठक होणार आहे. यावेळी 4 हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. पक्षातील हेवेदाव्यांवरही चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जातं. तसेच मित्र पक्षांनी लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात सहकार्य केले नाही, त्याचीही चर्चा या बैठकीत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. याशिवाय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर असल्याचे संकेतही या बैठकीतून देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.