Advertisement
मुंबई : राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीसुद्धा त्याच निवडणुकांसाठी अॅक्शन मोडवर आली आहे. विशेषत: भाजप खूपच सक्रिय झाली आहे. भाजपने विधानसभेसाठी खसा रणनिती आखली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला दुहेरी आकडाही गाठता आली नाही... याच निराशाजनक कामगिरीनंतर भाजप आता अॅक्शन मोडवर आली आहे. महाराष्ट्र भाजपकडून पराभवांच्या कारणांचा आढावा घेण्यात आला.. भाजप कोअर कमिटीची बैठक राज्याचे नवे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
आता एकला चलो रे ची भूमिका विधानसभेसाठी नको. स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये समन्वय राखा. महायुतीतल्या घटक पक्षांना एकत्र घेऊन आगामी निवडणुकीला सामारे जा असे आदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रभारींनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने 28 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त 9 खासदार निवडून आले. याचाच धडा भाजपने घेतलाय. त्यामुळे महायुती आता एकत्रितपणे विधानसभेला सामोरं जाणार आहे.
