#

Advertisement

Saturday, July 27, 2024, July 27, 2024 WIB
Last Updated 2024-07-27T11:13:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माझं बोट धरुन राजकारणात आल्याचं मोदी म्हणतात पण...!

Advertisement

छत्रपती संभाजी नगर : शरद पवार हे आपले गुरु असून त्यांचं बोट धरुन आपण राजकारणात आल्याचं विधान काही वर्षांपूर्वी मोदींनी केलं होतं. याच विधानाचा संदर्भ देत पवारांनी आता असा टोला लगावला, मला माझ्या बोटावर विश्वास आहे की ते कुणाच्या हातात दिलं नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
छत्रपती संभाजी नगरमध्ये पार पडलेल्या शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार – द ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाच्या उर्दू अवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवारांनी मोदींनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरुन सूचक विधान करत निशाणा साधला.
आज देशाची परिस्थिती बदलली आहे. निवडणुकीची परिस्थिती कशी होती. देशाचे पंतप्रधान त्यांचे सहकारी काय बोलत होते. ते असं बोलतात की देशाची रक्षा त्यातून होत नाही. त्यांनी बंगळूरमध्ये सांगितलं, आम्हाला 400 पार करायचं आहे. त्यांना संविधान बदलायच आहे. देशाचं संविधान देशाच्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार देते ते बदलणं लोकांना आवडलेलं नाही. त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला आहे, असं शरद पवार यांनी सांगितले.