#

Advertisement

Friday, July 26, 2024, July 26, 2024 WIB
Last Updated 2024-07-26T12:19:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपला सोडचिठ्ठी देत माजी आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश

Advertisement


गोंदिया : भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांनी अखेर घरवापसी केली आहे. कुथे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज आल्याने आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान जिव्हारी लागल्यानेच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं कुठे यांनी म्हटलं आहे.
मी आधी शिवसेनेत होतो आणि पुन्हा एकदा शिवसेनेत आलो आहे. 2019मध्ये मी भाजपला विधानसभेचे तिकीट मागितलं होतं. मला त्यांनी तिकीट दिलं नाही. त्यानंतर मी जिल्हा परिषद सभापतीसाठी माझ्या मुलाचं नाव समोर केलं होतं. तेव्हा सुद्धा त्यांनी मुलाला तिकीट नाकारलं. त्यानंतर माझा मुलगा अपक्ष म्हणून उभा राहिला आणि सभापती झाला. आता सुद्धा मला ते तिकीट देणार नव्हते. त्यामुळे इथे राहून उपयोग नव्हता, असं रमेश कुथे म्हणाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला. रमेश कुथे हे 1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांनी पराभूत केलं होतं. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतला. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर गोंदियात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे.