#

Advertisement

Wednesday, July 3, 2024, July 03, 2024 WIB
Last Updated 2024-07-03T12:06:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राहुल गांधी वारीत सहभागी होणार

Advertisement

शरद पवार यांच्याकडून निमंत्रण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांना वारीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यासाठी त्यांनी वारीचे महत्व राहुल गांधी यांना समजून सांगितले. त्यानंतर राहुल गांधी १४ जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहे, असे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले. 
आमदार संजय जगताप म्हणाले की, संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यात दीड लाख वारकरी सहभागी झाले आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी १४ जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे दर्शन ते वारीत घेणार आहेत. तसेच सर्वसामान्य वारकऱ्याप्रमाणे राहुल गांधी वारीत चालतील. राहुल गांधी यांना वारीत सहभागी होऊ न देणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवर ही संजय जगताप यांनी उत्तर दिले आहे. वारीच्या सोहळ्यात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा. तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर वारीत सहभागी व्हा. वारीच्या सोहळ्यात काय त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. 

भाजपकडून विरोध... 
भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राहुल गांधी यांच्या वारीत सहभागी होण्याचा निर्णयास विरोध केला आहे. हिंदुंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदुंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारीत येण्याचे निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवार यांना कोणी अधिकार दिला? असा प्रश्न आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला आहे.