Advertisement
अजित पवार यांनी दिले थेट निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे जागावाटप लवकरच होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ८५ जागा विधानसभा घेणारच असल्याचा दावा अजित पवार यांनी बैठकीत केला. पक्षांच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि मेळावे सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ८० जागा लढवणार असल्याचे सांगितले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्वत: अजित पवार यांनीच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. विधानसभा निवडणुकीचे जागावाटप लवकरच होणार आहे. जित पवार यांनी मित्र पक्ष सोबत वादग्रस्त विधान टाळा, असे सर्व आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते यांना बैठकीत सांगितले.
