Advertisement
पाच वर्षात किती वाढली कुटुंबाची मालमत्ता?
मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणूक उमेदवारीची यादी जाहीर झाली आहे. भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पंकजा मुंडेंना पक्षाकडून हिरवा कंदील दिला.त्यामुळे राजकीय वर्तुळात पंकजा यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पंकजा यांच्याकडे एकूण स्थूल मुल्य 6 कोटी 8 लाख 15 हजार रुपये आहे. प्रतिज्ञापत्रात पंकजा यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात 10 कोटी 67 लाख रुपयांनी वाढलेली आहे. पंकजा यांचे पती चारुदत्त पालवे यांची एकूण स्थूल मालमत्ता 10 कोटी, 49 लाख 34 हजार 813 रुपये इतकी आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे 2 लाख 85 हजाराचे 450 ग्रॅम सोने तर तीन लाख 28 हजार रुपयांची चार किलो चांदी असल्याचे सांगितले आहे. पंकजा यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहिर केलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार, पंकजा आणि त्यांचे पती चारुदत्त पालवे यांच्यावर 9 कोटी 84 लाखांचं कर्ज असल्याचं म्हटले होते. पंकजा यांचे बँकेत कागदपत्रे आणि शेअर्स आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. तर, पंकजा यांच्याकडे 450 ग्रॅम सोने असल्याची माहिती आहे, ज्याची किंमत3 लाखाच्या जवळपास असल्याची माहिती आहे. त्याशिवाय चार किलो चांदीची त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. पंकजा यांनी दागिन्यांमध्ये केलेली गुंतवणूक सुमारे 32 लाखांच्या जवळपास असल्याचे सांगितले गेले.
