Advertisement
आमदाराच्या मागणीमुळे अजितदादा यांच्यासमोर मोठा पेच
परभणी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. परभणी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. आम्ही आयुष्यात जे घडलो ते पवार साहेबांमुळे घडलो. त्यामुळे स्वगृही परतण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र, पक्षाकडे काही मागणी आहेत. पक्षाने आमच्यासोबत न्याय करावा. पाथरी विधानसभेतून बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवारी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. पक्षाने ही जबाबदारी दिल्यास आम्ही घरवापसी करायला तयार आहोत. मात्र, पक्षाने संधी दिली नाही तर अपक्ष लढू मात्र महायुतीतून लढणार नाही असे दुर्रानी यांनी स्पष्ट केले.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परभणीमधील एका कार्यक्रमात बाबाजानी दुर्रानी यांच्या मुलाने त्यांच्या हजारो समर्थकांसह हजेरी लावली. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे पाथरी विधानसभेतून बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवार मिळावी अशी मागणी केली. विशेष म्हणजे कालच बाबाजानी दुर्राणी यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती आणि आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांच्या समर्थकांनी उपस्थिती लावली.