#

Advertisement

Monday, August 5, 2024, August 05, 2024 WIB
Last Updated 2024-08-05T12:02:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधानसभा निवडणुकीचं बिगुल 20 सप्टेंबरपासून वाजणार

Advertisement

20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागण्याचीही शक्यता 
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडतायत.. राजकीय वातावरण दिवसेंदिवस आणखीनच तापत चाललंय.... आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत..गणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार असल्याची चर्चा आहे.  20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागण्याचीही शक्यता आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारला कुठल्याही सरकारी घोषणा, नवीन योजना सुरु करता येत नाहीत.  शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत. सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे. कुठल्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते.  कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही.  जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे.  प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची सुरुवात होतेय तर 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच म्हणजे 20 सप्टेंबरपासूनच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार