Advertisement
इंदापूर : भाजपचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या बावडा गावात कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केलीय. त्यामुळं पाटलांनी महायुतीत वेगळी चूल मांडल्याची जोरदार चर्चा आहे. इंदापूरच्या मैदानात पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
1995, 1999 आणि 2004 या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढवल्या आणि जिंकल्या. 1999 आणि 2004 मध्ये त्यांनी विमान चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकली होती. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी. हर्षवर्धन पाटलांनी मध्यंतरी काँग्रेसमध्ये प्रेवश केला होता.
मात्र, आघाडीत अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली. आता पुन्हा तेच अजित पवार हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय प्रवासात अडसर ठरत असल्यानं कार्यकर्ते पेटून उठलेत. इच्छुकांची संख्या वाढल्यानं इंदापूरमध्ये यावेळी काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे इंदापूरचे विद्यमान आमदार आहेत. - हर्षवर्धन पाटलांनीही इंदापूरमधून लढण्याचे संकेत दिलेत. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आप्पासाहेब जगदाळे देखील इच्छूक आहेत. युवा नेते आणि सोनाई उद्योगसमूहाचे संचालक प्रवीण मानेही इच्छुकांच्या रांगेत आहेत.
