#

Advertisement

Monday, August 5, 2024, August 05, 2024 WIB
Last Updated 2024-08-05T12:11:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्रणिती शिंदे यांचा दिलीप मानेंसाठी "ग्रीन सिग्नल"

Advertisement

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने यांचा वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या वतीने नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. हा वाढदिवसाच्या विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शन ठरले.
प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात दिलीप माने यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. परंतु 2019 मध्ये त्यांनी पक्ष सोडल्याने त्याबद्दल नाराजी ही त्यांनी बोलून दाखवली. पण प्रणिती शिंदे यांच्या खासदारकीच्या विजयात दिलीप माने यांचाही वाटा असल्याने त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करताना तुम्ही या परिवारात आले असताना येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये निश्चितच यश तुमचं आहे, त्यासाठी लाडक्या बहिणी कडून तुम्हाला शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी नकळत दिलीप माने यांना दक्षिणसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे दिसून आले.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, दिलीपरावांना भविष्यात कुठे ही संधी असेल त्यावेळेस आम्ही त्यांच्या सोबत राहू, जो काय हायकमांड निर्णय घेईल त्याचा पाठीशी उभा राहू.
दिलीप माने यांनी आपल्या 62 वर्षाच्या प्रवासाचे अनुभव सांगितले, मी जिथे राहतो तिथे प्रामाणिक असतो, आजही मी शिंदे कुटुंबाशी प्रामाणिक आहे. त्यामुळे जनतेची सेवा करण्याचा मला आशीर्वाद द्या असे आवाहन केले.