Advertisement
मुंबई : राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री मेरी लाडली बहिणा योजनेप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. आता या योजनेच्या नावावरुन अजित पवार आणि सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील कारण आहे अजित पवार गटाने आपल्या जनसन्मान यात्रेआधी परस्पर या योजनेच्या नावामध्ये बदल केला आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण या योजनेसाठी अंतरिम बजेटमध्ये चालू आर्थिक वर्षात 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं जाहीर केलं. यावरुन बराच वाद झाला. हा पैसा नेमका उभा कठून आणि कसा करणार याबद्दल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मात्र यावर सरकारकडून सविस्तर स्पष्टीकरण स्वत: अजित पवारांनी दिलं. या योजनेवरुन होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सर्व सत्ताधारी पक्ष एकत्र आल्याचं दिसून आलं असलं तरी आता याच योजनेच्या नावावरुन सत्तेत असलेल्या अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
अजित पवारांची जनसन्मान यात्रा 8 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या यात्रेच्या जाहिरातीचे पोस्टर्स नुकतेच समोर आले आहेत. या पोस्टरमध्ये अजित पवार मोठ्या आकाराचा नमस्कार करताना फोटो दिसत असून त्या खाली प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ आधी ज्येष्ठ नेत्यांचे फोटो दिसत आहेत. त्या खालोखाल या यात्रेच्या पोस्टवर 'लाडकी बहीण योजने'ची जाहीरात करण्यात आली आहे.
