#

Advertisement

Monday, August 5, 2024, August 05, 2024 WIB
Last Updated 2024-08-05T11:47:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मनसेकडून शिवडी आणि पंढरपूरचे उमेदवार जाहीर

Advertisement

सोलापूर :मनसेकडून  विधानसभेसाठी दोन उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत. शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलीय.. तर वरळी विधानसभेतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वरळीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. यावेळी संदिप देशपांडेंना तिथून संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. संदीप देशपांडे यांच्या नावाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. वरळीसह दक्षिण मुंबईत मनसेने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मराठी बहुल भागात मराठी माणसांच्या नोकऱ्या, घरांचे प्रश्न मनसेकडून सातत्याने मांडण्यात येतात. दरम्यान आगामी निवडणुकीत मनसे कोणत्या रणनीतीने मैदानात उतरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.