#

Advertisement

Friday, August 2, 2024, August 02, 2024 WIB
Last Updated 2024-08-02T12:19:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

‘आर्टी’ विषयी अ‍ॅड. कोमलताई म्हणाल्या की...

Advertisement

मातंग समाजाच्या प्रगतीसाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय 

पुणे : महाराष्ट्र राज्य शासनाकडून आर्टीची (रपपरलहर्री ीरींहश ीशीशरीलह रपव ींीरळपळपस ळपीींर्ळींीींश) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत मातंग समजाच्यावतीने राज्य शासनाकडे गेली काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात मोठा वाटा असलेल्या बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्याशी या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश तसेच कार्यपद्धती याविषयी लक्षवेधीने माहिती घेतली असता त्यांनी विविध मुद्दे स्पष्ट केले.

अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, मातंग समाजाच्या विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात समाजाची मागणी होती. त्या अनुषंगाने यावर्षीच्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी अण्णा भाऊ साठे संशोधन केंद्र स्थापनेची घोषणा केली होती. मातंग समाजाच्या विकासासाठी हे फार मोठे पाऊल ठरणार आहे. अनुसूचित जातीमधील समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी) स्थापन झाले होते. त्याच धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन केंद्राची (आर्टी) स्थापना झाल्याने मातंग समाजाला दिलासा मिळाला आहे. मातंग समाजाच्या प्रगतीसाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे. 

शासनाने स्थापन केलेले बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी) अनुसूचित जातीमध्ये असलेल्या 59 जातींसाठी काम करते. परंतु, या केंद्राच्या स्थापनेपासून एकाच जातीला याचा जास्त लाभ मिळत असल्याचे मातंग समाजाचे म्हणणे होते. त्यामुळे ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ची स्थापना करावी, अशी मागणी मातंग समाजाची होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राला 325 कोटी रुपये अर्थसहाय्य मिळते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण, व्यवसाय, प्रशिक्षण यांसह विद्यार्थी व समाजाच्या प्रगतीसाठी हा निधी खर्च करण्यात येतो. परंतु, बार्टीच्या स्थापनेपासून अनुसूचित जातीमधील 59 जातींना समान लाभ मिळत नव्हता, याच कारणातून आर्टी ही स्वतंत्र संस्था स्थापन व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न होते त्यास यश आले.  


आर्टी संस्थेची महत्त्वाची कामे 

  • संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचार पिढी चालू ठेवणे आणि विकास करणे.
  • विविध क्षेत्रांमध्ये प्राचलित असलेली सामाजिक समता याविषयी संशोधन करून सामाजिक समता तत्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल याबाबत संशोधन करणे.
  • सामाजिक समता याविषयी निगडित असे व्यवसायिक ज्ञान तसेच अशा विचारांना देवाण-घेवाण करण्यासाठी तरुण व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशास्त्राचा  दृष्टिकोनातून सर्वांगिण वाढ होईल असे प्रशिक्षण देणे.
  • संस्थेच्या उद्दिष्टानुसार सुकर शिक्षणक्रम, संमेलन, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद असे इतर कार्यक्रम आयोजित करण्याचे काम हाती घेणे.
  • समाजातील विविध स्तरांमध्ये सामाजिक समता या तत्वप्रणाली आधारित सहकार्याच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि त्याबाबत अधिक संशोधन करणे व त्यानुसार अनुभव, विचार व परिवर्तन करणे बाबत समाजामध्ये अधिक चांगले जीवन निर्माण करून सामाजिक समता या कार्यक्रमास उचलून धरणे.
  • संस्थेच्या उद्दिष्ट अशी संबंधित अशी पुस्तके, नियतकालिके आणि संशोधनात्मक, निबंध प्रकाशित करणे.
  • शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व  स्वयंरोजगार प्रशिक्षण,  स्टार्ट-अप, रोजगार निर्मिती, प्रचार, प्रसार, प्रसिद्ध ,सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास करणे व त्याच्याशी निगडित योजना राबविणे.
  • लोकगीते, लोकसंस्कृती, लोककला संदर्भात संशोधन, प्रशिक्षण, प्रचार, प्रसिद्ध करणे.
  • परंपरागत व्यवसायांना चालना देणे ,आर्थिक मदत करणे कला कौशल्य  यांचे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद भरविणे व सहभागी होणे.
  • अण्णाभाऊ साठे यांच्याशी संबंधित प्रसिद्ध करणे व अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध करणे आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये भाषांतर करणे.