#

Advertisement

Tuesday, August 20, 2024, August 20, 2024 WIB
Last Updated 2024-08-20T13:06:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

युती तोडायची असेल तर आमचीदेखील तयारी !

Advertisement

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांचा वाद 

मुंबई :  राक्षसी महत्वाकांक्षा असलेली युती तोडा; तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू, असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिले. ठाणंपण आमचं, कोकणंपण आमचंच, जिथे युती आहे तिथे गुडघ्याला बाशिंग बांधून आम्हीच लढणार, असे लोकसभेला पाहिले. असे असेल तर युती तोडा आणि तुमचं तुम्ही लढा असे रामदास कदम म्हणाले. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. युती तोडायची असेल तर आमचीदेखील तयारी आहे, असे प्रत्युत्तर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिले आहे. 
महायुती असताना धर्म पाळायला पाहिजे. भाजपच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता समजून घ्या. युतीची गरज सर्वांना आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आहे. चांगल्या वातावरणात मिठाचा खडा टाकू नये. उणीधुणी काढली तर आमचीही तयारी आहे. युतीची गरज फक्त भाजपला आहे, असं रामदास कदमांना वाटत असेल तर त्यांचा तो गोड गैरसमज आहे. आमचे कार्यकर्तेदेखील मनावर दगड ठेवून सर्वाला सामोरे जात आहेत, हे रामदास कदमांनी लक्षात ठेवावं, असे दरेकरांनी सांगितले. रामदास कदम यांचा मुलगा ज्या ठिकाणी आमदार आहे, तिथे त्यांना भाजपची गरज आहे. त्यांना मंत्री व्हायच होतं. ते न झाल्याने अस्वस्थ आहे. वैफल्यातून त्यांची खदखद बाहेर येत असल्याचे ही  दरेकर यांनी स्पष्ट केले.