Advertisement
कुटुंबासाठी एकपाऊल मागे घेत उमेदवारीच्या स्पर्धेतून अश्विनी जगताप यांची माघार
पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील दीर-भावजय वादात समेट झाल्याचे सांगितले जात आहे. आमदार अश्विनी जगताप यांनी कुटुंबासाठी एकपाऊल मागे घेत उमेदवारीच्या स्पर्धेतून त्यांनी माघार घेतल्याचे सूत्रांकडून कळते. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आमदार अश्विनी जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
चिंचवड विधानसभा मतदारसंघावर निर्मितीपासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व राहिले. परंतु, दीर्घ आजाराने 2023 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी आणि बंधू शकर जगताप यांच्यात उमेदवारीवरुन रस्सीखेच झाली होती. दोघांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु, पक्षश्रेष्टींनी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोघांनीही दावेदारी केली होती. कुटुंबाच्या वादात आमदारकी बाहेर जाण्याची शक्यता वाढली होती. पक्षांतर्गत विरोधकांनीही डोकेवर काढले होते. गृहकलाहामुळे कुटुंबाचे नुकसान होण्याची शक्यता बळवाली होती. त्यामुळे आमदार अश्विनी जगताप यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
