#

Advertisement

Thursday, August 22, 2024, August 22, 2024 WIB
Last Updated 2024-08-22T12:00:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदार कल्याणशेट्टींनी आयतेच बटण दाबलेे !

Advertisement

पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे यांनी केली टीका 

सोलापूर : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना एकरुख उपसा सिंचन योजनेचे आयतेच बटण दाबलेे, या संपूर्ण सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अक्कलकोट : मार्गदर्शनाखाली मी केला. जनतेसमोरही या योजनेचा वास्तव प्रवास मी मांडत आहे. याबाबतचे माजी मुख्यमंत्री यांचे आदेश व जलसंपदा मंत्री यांचे प्रशासकीय स्तरावर चालू असलेल्या कार्यवाहीचे पत्र, असे पुरावे मी मांडू शकतो. त्यामुळे एकरूख उपसा सिंचन योजनेचे श्रेय आजी-माजी आमदारांनी घेऊ नये, अशी थेट टीका पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे यांनी केली आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वीच अक्कलकोट मतदार संघात भारतीय जनता पक्षातील अंतर्गत राजकारण समोर आल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. बाळासाहेब मोरे यांनी एकरूप उपसा सिंचन योजनेच्या अंतिम टप्प्यातील मंजुरीवरून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावरही टीका केली आहे. एकरुख उपसा सिंचन योजनेचा संपूर्ण प्रस्ताव ते पाठपुरावा आपण केल्याचे तसेच याबाबतचे पुरावे पुरावे आपल्यााकडे उपलब्ध असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. त्याामुळे या योजनेबाबतचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. असे आवाहन करीत आमदारांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यावे, असे मोरे यांनी स्पष्ट केले आहे. 

एकरुख उपसा सिंचन योजना महत्त्वाची
या योजनेमुळे अक्कलकोट शहराचा व 51 गावाचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील 51 गावांतील 10 हजार 110 हेक्टर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 19 गावची 7 हजार 200 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे याच कारणातून ही योजना अक्कलकोट व दक्षिण सोलापूरसाठी किती महत्वाची आहे.