#

Advertisement

Thursday, August 22, 2024, August 22, 2024 WIB
Last Updated 2024-08-22T12:13:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कोल्हापुरात भाजपला खिंडार

Advertisement

मुश्रीफांच्या विरोधात समरजीत घाटगे हाती घेणार तुतारी 

कोल्हापुर : भाजपला खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक इच्छुकांची गोची होत असल्याने,  आजी-माजी पदाधिका-यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. भाजप नेते समरजित घाटगे लवकरच भाजपला रामराम ठोकणार असल्याचं समजतंय. कागलमधून पुन्हा एकदा हसन मुश्रीफांना उमेदवारी देण्याची घोषणा अलिकडेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली.. त्यामुळं त्यांचे कट्टर विरोधक असलेले समरजित घाटगे अस्वस्थ झाले आहेत.
मुश्रीफांच्या विरोधात समरजीत घाटगे तुतारी हाती घेणार असल्याचं समजत..सप्टेंबरमध्ये ते राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  येत्या 23 ऑगस्टला घाटगेंनी कागलमध्ये शाहू सहकारी साखर कारखान्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात घाटगे आपली भावी राजकीय दिशा जाहीर करणार आहेत. साथ आपल्या माणसांची.. चला..परिवर्तन घडवूया ! अशी पोस्ट  समरजित घाटगे यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.