#

Advertisement

Wednesday, August 28, 2024, August 28, 2024 WIB
Last Updated 2024-08-28T11:35:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करू का?

Advertisement

सुप्रीम कोर्टाने पुन्हा राज्य सरकारला सुनावल 

दिल्ली : पुण्यात जमीन अधिग्रहणानंतर राज्य सरकारने कुठलाही मोबदला दिला नाही, म्हणून याचिकाकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. गेल्या आठवड्यात या प्रकरणी सुनावणी झाली होती. दरम्यान आज पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी पार पडली. मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत फटकारलं होतं. योजना जाहीर करुन फुकटचे वाटायला पैसे आहेत, मग जमीन अधिग्रहणासाठी द्यायला पैसे का नाहीत? असा सवाल राज्य सरकारला विचारला होता. दरम्यान आजच्या सुनावणीतही कोर्टाने लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला.
सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या वकिलांची कानउघाडणी केली. जर योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळले नाही तर आम्ही अवमान याचिका दाखल करू शकतो असा इशारा सुप्रीम कोर्टाने दिली आहे. तसंच कोर्टाकडून आजदेखील लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला. आदेशात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करू का? अशी विचारणा कोर्टाने केली.  कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर प्रतिज्ञापत्र मागे घेण्याबद्दल राज्य सरकारचे वकील बोलले. यानंतर कोर्टाने पुन्हा त्यावर सरकारी वकिलांना सुनावलं. राज्य सरकारने योग्य मूल्यांकन करून कोर्टात नवं प्रतिज्ञापत्र सादर करावं असा आदेश राज्य सरकारला देण्यात आला.