#

Advertisement

Tuesday, August 27, 2024, August 27, 2024 WIB
Last Updated 2024-08-27T13:50:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात फोडली महायुतीच्या काळ्या कारनाम्याची दहीहंडी

Advertisement

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजन 

सोलापूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी सात रस्ता चौकामध्ये राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे भांडाफोड करण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यात महायुती सरकार आल्यापासून भ्रष्टाचार, बेरोजगार, महागाई वाढली असून हे सर्व जनतेसमोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने महायुतीचे काळे कारनामे हे पेपर छापले आहेत ते जनतेला आम्ही देत आहोत, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचारी युतीच्या सोबत राहू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, मनोहर सपाटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, यू.एन. बेरीया, जनार्दन कारमपुरी, प्रशांत बाबर, सर्फराज शेख, चंद्रकांत पवार, मिलिंद गोरे, अजित बनसोडे, सनी म्हेत्रे, शक्ती कटकदौंड, अक्षय जाधव, महिला अध्यक्षा सुनिता रोटे, रेखा सपाटे, वंदना भिसे, सिया मुलाणी, कविता कोडवाल, गौरा कोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.