Advertisement
दिल्ली : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची राज्य सरकारवर नाराजी आहे. राज्य सरकारने प्रकरण गांभीर्याने हाताळायला हवं, अशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका आहे. सिंधुदुर्गात मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळला यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर काही मंत्र्यांची विधानं हास्यास्पद आणि चिंताजनक असल्याची तक्रार करण्यात आली आहे. राज्य सरकारने प्रकरण गांभीर्याने हाताळायला हवं होतं, अशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका आहे. घटना कुणामुळे घडली, जबाबदारी कुणाची यावर भाष्य करण्यापेक्षा जनतेमधील असंतोष वाढू न देणं गरजेचं आहे. शिवरायांच्या पुतळ्याची योग्य देखभाल घ्यायला हवी होती”, असं मत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं आहे. विरोधकांकडून या घटनेचा राजकीय मुद्दा बनवला जात असेल तर गांभीर्याने विचार करावा”, असा सल्ला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्य सरकारला दिला आहे.
