Advertisement
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वॉटिंग करणे काँग्रेसच्या आमदारांना चांगलेच महागात पडणार आहे. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वॉटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या पाच आमदारांचा पत्ता कट होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत यांना तिकीट मिळणार नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. काँग्रेस हायकमांडने पाच आमदारांना तिकीट देऊ नका असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचबरोबर पाच मतदार संघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे नाना पटोले यांना काँग्रेस हाय कमांडने आदेश दिले आहेत.
काँग्रेसचे बंडखोर आमदार
सुलभा खोडके - अमरावती
झिशान सिद्दीकी - वांद्रे पूर्व
हिरामन खोसकर - इगतपुरी
जितेश अंतापूरकर - नांदेड दक्षिण
मोहन हंबर्डे - देगलूर
