#

Advertisement

Saturday, August 17, 2024, August 17, 2024 WIB
Last Updated 2024-08-17T11:30:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्हही दिलं असतं?

Advertisement

जळगाव :  खोकेवालं हे सरकार आहे. मात्र जनता ही खोकेवाली नाही, इमानदार आहे. निवडणुकीच्या आधी प्रत्येक महिलेला 10 हजार रुपये देणार आहे म्हणजे प्रत्येक महिलांच्या मताची किंमत 10 हजार रुपये का?, असा संतप्त सवाल शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तर भावाने मागितलं असतं तर त्याला पक्ष आणि चिन्हही दिलं असतं. वरती काय घेऊन जायचं आहे, असंही त्या म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळे या आज जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे आहेत. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. सुप्रिया मला पक्ष आणि चिन्ह दे असं मला अजितदादांनी विचारलं असतं. भावाने मला चिन्ह आणि पक्ष मागितला असता तर सगळं दिलं असतं. तू मोठा आहेस. तुझा अधिकार आहे. घे तुला पाहिजे ते असं मी म्हटलं असतं. वरती काय घेऊन जायचं आहे?, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मी कधीही कुणाची बदली करा, पक्षाच्या कार्यालय इकडे नको इकडे करा. असं कधी म्हटलं नाही. आज आमचा पक्ष नेला. चिन्ह नेलं. उद्या तुमच्या घरात घुसतील आणि म्हणतील ही शेती आमची आहे. कुणी काही म्हटलं तरी मी लढा देत राहणार कारण कोर्टामध्ये केस आहे. तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा घात केला तर मी कसं चूप बसू शकते? कोणीतरी लढला पाहिजे. त्यामुळे माझी ही लढाई सुरू आहे, असं त्या म्हणाल्या.

तुमच्यासमोर झुकणार नाही.......
एकीकडे भाऊ आणि दुसरीकडे वडील. भाऊ म्हटला, माझ्यासोबत चल. मी त्याला म्हटलं, दुसरीकडे नैतिकतेची लढाई आहे. आणि मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले. आज मला वाटतं की माझा निर्णय बरोबर होता. कधीही मी दिल्लीसमोर मुजरा करणार नाही. कष्टाने खाल्लेली अर्धी भाकर खाईल. पण तुमच्यासमोर झुकणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.