#

Advertisement

Tuesday, August 6, 2024, August 06, 2024 WIB
Last Updated 2024-08-06T12:21:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धाराशिवमध्ये राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये आंदोलक शिरले

Advertisement

मराठा आंदोलकांचा राडा 
धाराशिव : मराठा आंदोलकांनी राडा घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे धाराशिव दौऱ्यावर आहेत. ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला. मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट मागितली होती. मराठा आरक्षणावर त्यांना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायची होती. पण राज ठाकरे यांनी भेट नाकराल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर, धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याचा आजता त्यांचा दुसरा दिवस आहेय. आपल्या दौऱ्यात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 11 विधानसभा मतदारसंघांचा ते  आढावा घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी आरक्षणाव वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे.  धाराशिव जिल्ह्यात राज ठाकरे पुष्पक हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काही मराठा आंदोलक पुष्पक हॉटेलमध्ये आले. पण राज ठाकरे यांनी भेटण्यासाठी नकार दिला. त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी हॉटेलमध्येच घोषणाबाजी सुरु केली.