Advertisement
विधानसभेसाठी अजित पवार ॲक्शन मोडवर
बारामती : लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या झालेल्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोड वरती आले आहेत. बारामतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. पदाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात राजीनामे द्यावेत असे आदेशच अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे शहर, तालुक्यात आता भाकरी फिरवली जाणार असून, नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना संधीचा मार्ग मोकळा झालाय. बारामतीत अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडे राजीनामे मागितलेत. 15 ऑगस्टपूर्वी पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती केली जाणार आहे.
