Advertisement
मनसेनं सोलापुरवर लक्ष केंद्रित केले
सोलापूर : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी यापुढे जात मनसेच्या २ उमेदवारांची नावं घोषित करून पहिला डाव टाकला आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना मनसेनं उमेदवारी जाहीर केली आहे.
पंढरपूरमधून मनसेनं दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली. पंढरपूरमध्ये सध्या भाजपचे समाधान आवताडे विद्यमान आमदार आहेत. इथं मविआकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शाखा प्रमुख ते मनसेचे राज्याचे नेते असा त्यांचा प्रवास आहे. विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांचे समर्थक आहेत. त्यांनतर तालुका पातळीवर शिवसेना पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर त्यांच्यासोबत राहिले. सोलापूर जिल्हा संघटक पदावर काम केले. सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील राज ठाकरे यांची सभा यशस्वी केली होती. 2009 साली पंढरपूर विधानसभा मनसेकडून लढवली होती. सोलापुरात पदाधिका-यांसोबत बोलताना राज ठाकरे यांनी तसे संकेतच दिलेत. गेल्या काही दिवसांपासून मनसेनं सोलापुरवर लक्ष केंद्रित केल आहे.
