#

Advertisement

Friday, August 9, 2024, August 09, 2024 WIB
Last Updated 2024-08-09T11:45:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लातूरमध्ये महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडले

Advertisement

लातूर :  लातूरमध्ये महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. चाकूर तालुक्यातील शिवणखेडमध्ये हा प्रकार घडला. सरपंच बायनाबाई साळुंके या ग्रामपंचायत कार्यालयात बसले असताना अचानक तिथे गावातील नागरिक आले आणि त्यांनी त्यांच्यावर दमदाटी करण्यास सुरुवात केली. बांधकाम कामगार योजनेच्या फॉर्मवर सह्या करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला होता. महिला सरपंच बायनाबाई साळुंके यांनी बांधकाम कामगार योजनेच्या फॉर्मवर सह्या करण्यास नकार दिल्यानंतर गावकरी आक्रमक झाले. या मोर्चातील सुरज साके या व्यक्तीने सरपंच बायनाबाई साळुंके यांना चक्क ग्रामपंचायत कार्यातलयात कोंडूत कार्यालयाला कुलूप लावले. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन  सरपंच बायनाबाई साळुंके यांची सुटका केली. दरम्यान या प्रकरणी लातूरच्या चाकूर पोलीस ठाण्यात आरोपी सुरज साके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.