Advertisement
भोसरी येथे केंद्र सुरु करून दिली सुविधा : महिलेचा मोठा प्रतिसाद
पुणे : महायुती सरकारने महिलांसाठी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेला भरभरून प्रतिशत मिळत आहे. मात्र, याचे फॉर्म भरताना ते योग्यरित्या भरावेत, असे आवाहन बहुजन रयत परीषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी केले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरताना चुका झाल्यास त्याचा लाभ मिळणार नाही, या कारणास्तव ऍड. कोमलताई यांनी स्वतः पुढाकार घेत योजनेचे फॉर्म भरून देण्यासाठी स्वतंत्र केंद्र सुरु केले आहे. या महिलांकडून प्रचंड प्रदिसाद मिळत आहे. या पार्शवभूमीवर ऍड. कोमलताई यांनी सदर आवाहन केले आहे.
याबाबत त्या म्हणाल्या की, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सुबत्ता आणि आधार देण्याच्या हेतूनं राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून, नुकतंच या योजनेत सहभागी असणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण, या सर्वच अर्जांमधून सर्वांनाच योजनेत नमूद करण्यात आलेली रक्कम मिळेल असं नाही. कारण, ही रक्कम मिळण्यासाठी अर्जावर काही गोष्टींची नोंद असणं महत्त्वाचं ठरत आहे. Pending Status - पेंडिंग अर्थात अर्थ प्रलंबित असल्याचं स्टेटस तुम्हाला दिसत असल्यास सदर अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं स्पष्ट होतं. Reject Status - अर्जावर रिजेक्ट अर्थात बाद किंवा रद्द असा शेरा असल्यास तुमचा अर्ज नाकारला गेल्याचं लक्षात घ्यावं. Review Status - अर्जाच्या स्टेटसमध्ये Review म्हणून दिसत असल्यास तुमचा अर्ज पुनरावलोकन टप्प्यावर आहे, असे समजावे. Approval Status - हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, अर्ज तपासून त्याची पडताळणी प्रक्रियाही पूर्ण झाल्याची बाब स्वीकृती अर्थात Approval Status दर्शवतो. वरील चारही टप्प्यांमधून अर्ज पुढे जात असून, अर्जावर Approval Status दिसत असल्यासच त्या अर्जदार महिलेला सरकारमान्य 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. त्याव्यतिरिक्त Pending किंवा Review स्टेटस दिसत असल्याच निधीसाठीची प्रतीक्षा आणखी लांबते हे लक्षात घ्यावं, अर्ज प्रलंबित विंका पुनरावलोकन टप्प्यांमध्ये असला तर निधी येण्यासाठीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. अर्ज रिजेक्ट झाल्यास मात्र खात्यावर कोणतीही रक्कम जमा होणार नाही, पण, अर्ज भरताना काहीही चूक न होताही अर्ज प्रलंबित दिसत असल्याच अर्जदारांनी चिंता करू नये. हा अर्ज पुढील प्रक्रियेतून जात असून, तपासणी प्रक्रिया सुरू असल्यामुळंही Pending Status दाखवलं जातं, असे मुद्दे ऍड. कोमलताई यांनी स्पष्ट केले.
