#

Advertisement

Friday, August 9, 2024, August 09, 2024 WIB
Last Updated 2024-08-09T11:04:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अमोल कोल्हे, जयंत पाटील थोडक्यात बचावले

Advertisement

शिवनेरीच्या पायथ्याशी  नेमकं काय घडलं?
शिवनेरी : शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. दरम्यान येथे एक विचित्र अपघात घडला. अमोल कोल्हे आणि जयंत पाटील ज्या क्रेनच्या ट्रॉलीवर उभे होते, ती ट्रॉली कलंडली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे थोडक्यात बचावले.
शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे. यावेळी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर क्रेनची ट्रॉली एका बाजूला कलंडली.यावेळी क्रेनच्या ट्रॉलीत जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबुब शेख, रोहिणी खडसे होत्या. चौघेही एका बाजूला कलंडले.सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नसून सर्व जण सुखरुप आहेत.छत्रपती शिवरायांचा पुतळा उंचावर असल्याने क्रेनच्या सहाय्याने हे नेते उंचावर चढले होते. दरम्यान क्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्याची ट्रॉली कलंडली.