#

Advertisement

Wednesday, August 7, 2024, August 07, 2024 WIB
Last Updated 2024-08-07T12:07:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धाराशिवमधील गोंधळ प्रकरण, आंदोलकांवर गुन्हे दाखल

Advertisement

धाराशिव : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ घालणाऱ्या 11 मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा मराठा तरुणांनी निषेध करत जाब विचारला होता. शहरातील हॉटेल पुष्पक पार्क येथे राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये घुसून गोंधळ घातला. मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंची भूमिका विचारण्यासाठी मराठा तरुण गेले होते. राज ठाकरेंची भेट न झाल्याने तरुणांनी गोंधळ झाला होता. आनंद नगर पोलीस स्थानकात 11 मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.