Advertisement
लोकपोलच्या सर्व्हेचा दावा
मुंबई : लोकपोल संस्थेचा ओपिनियन पोल समोर आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती 115 जागांवरच थांबणार असल्याचा दावा लोकपोल सर्व्हेतून करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 141 ते 154 जागा मिळणार असल्याचं लोकपोलच्या सर्व्हेत म्हटलं आहे. लोकपोल संस्थेने केलेल्या ओपिनियन पोलमध्ये मविआला बहुमत दिसत आहे.
लोकपोलच्या सर्व्हेनुसार, महायुतीला 115 ते 128 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीला एकूण मतांच्या 38 ते 41 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 141 ते 154 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच मविआला एकूण मतांच्या 41 ते 44 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे, असं लोकपोलच्या सर्व्हेतून स्पष्ट होत आहे.
