#

Advertisement

Tuesday, September 10, 2024, September 10, 2024 WIB
Last Updated 2024-09-10T12:33:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

चिरंजीवांच्या कारभारामुळे बावनकुळे यांच्या अडचणी वाढणार?

Advertisement

नागपूर: नागपूर हिट अँड रन प्रकरणातील ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांची होती. एवढेच नव्हे तर अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये उपस्थित असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याप्रकरणावरुन आणखी राजकारण पेटण्याची शक्यता आहे. मात्र, चिरंजीवांच्या कारभारामुळे बावनकुळे यांच्या अडचणी वाढणार?  अशीच चर्चा आहे.
दरम्यान पोलिसांनी अपघातानंतर कारमध्ये उपस्थित असलेल्या अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार यांची वैद्यकीय चाचणी केली. मात्र, अद्याप संकेत बावनकुळेची वैद्यकीय चाचणी केलेली नाही. हा मुद्दाही पुढे राजकीय गदारोळाचा कारण बनू शकतो. नागपूर पोलिसांनी संकेत बावनकुळे याची पोलीस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी केली आणि त्यानंतर आज सकाळी आतापर्यंत झालेल्या तपासाच्या आधारावर अपघातावेळी संकेत बावनकुळे ही कारमध्ये उपस्थित असल्याचा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे घटनेच्या वेळेला अर्जुन हावरे हा कार चालवत होता. तर संकेत बावनकुळे समोरच्या सीटवर त्याच्या शेजारी बसलेला होता, तर रोनीत चिंतमवार मागील सीटवर बसला होता, अशी माहिती झोन 2 चे उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.