#

Advertisement

Tuesday, September 10, 2024, September 10, 2024 WIB
Last Updated 2024-09-10T12:51:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बारामतीत अजित पवारांचा फोटो शिंदेच्या पदाधिकाऱ्याने काळ्या कापडाने झाकला

Advertisement

बारामतीत: महायुतीमधील धुसफूसीच्या घटना समोर येत आहेत. ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हामुख सुरेंद्र जेवरे यांनी निमंत्रण देवून सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे गेले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या सुरेंद्र जेवरे यांनी टोकाचं पाऊल उचललं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये एकनाथ गणेशोत्सव साजरा केलेला आहे. या गणेशोत्सवाच्या मंडपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार यांचेही फोटो त्यांनी लावले होते. अजित पवार यांनी बारामतीत सगळ्या गणेशोत्सवांना भेटी दिल्या. मात्र आपल्या गणेशोत्सवाला भेट दिली नाही म्हणून सुरेंद्र जेवरे यांनी त्यांच्या फोटोला काळे कापड लावले. या घटनेनंतर तणाव वाढताच पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अशी घटना घडल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना लागलीच ताब्यात घेतले. सुरेंद्र जेवरे यांनी या घटनेनंत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेनुसार, अजित पवार यांनी मुद्दामून आपल्या गणपती मंडळाला भेट दिली नाही. त्यामुळे आपण अशाप्रकारचं कृत्य केल्याचं सुरेंद्र जेवरे यांनी सांगितले.