#

Advertisement

Wednesday, September 11, 2024, September 11, 2024 WIB
Last Updated 2024-09-11T12:27:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

निवडणूक कार्यक्रमाची लवकरच घोषणा : 13 सप्टेंबर ला निवडणूक आयोगाची बैठक

Advertisement

मुंबई : महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात आलेला नाही. मात्र निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली नसली तरी लवकरच होण्याचे संकेत मिळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील आगामी निवडणुकांच्या तयारीला लागल्याचं चित्र दिसत आहे.
राज्यातील विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्येच होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यामध्ये निवडणूक आयोगाकडून निवडणूक घेण्यासंदर्भातील चाचपणी आणि तपासणी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील मुख्य निवडणूक आधिकारी 13 सप्टेंबर रोजी राज्यातील निवडणुकीच्य तयारीचा आढावा घेणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक आधिकाऱ्यांची मुख्य निवडणूक आयुक्तांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होणार आहे.. राज्यातील  निवडणूक कर्मचारी, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रांसहीत इतर गोष्टींचा आढावा बैठकीतून घेण्यात येणार आहे.. त्यामुळे निवडणूक आयोग कामाला लागल्याचं चित्र दिसत आहे. राजकीय पक्षांनीही कामाला सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चांना वेग आल्याचं पाहायला मिळत असून पुढील काही आठवड्यांमध्ये जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे.