Advertisement
सोलापूरचे फारूक शाब्दी यांच्या नावाची घोषणा
छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणूकांसाठी बहुतांश पक्षांकडून हळूहळू उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. एमआयएमने एकीकडे महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता विधानसभेसाठी 5 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यात इम्तियाज जलील यांच्यासह आणखी ४ उमेदवार आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घोषणा केली आहे.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर MIM पक्षाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद झाली. यात MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी एकूण 5 उमेदवारांची घोषणा केली असून उरलेल्या उमेदवारांची यादी नंतर जाहीर करणार असल्याचं सांगितलंय. या पाच उमेदवारांमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्यासह धुळ्यातून फारूक शाह , मालेगावचे मुक्ती इस्माईल, मुंबईतून रईस लष्करीया, सोलापूरचे फारूक शाब्दी यांच्या नावाची घोषणा केली आहे. इतर विधानसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवारांची निवड केली हे नंतर जाहीर करणार असल्याचं ओवेसींनी सांगितलं.
दरम्यान, MIM ने महाविकास आघाडीला सामील होण्यासाठी प्रस्ताव दिला होता. सप्टेंबर मध्यापर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशाराही देण्यात आला होता.
