Advertisement
आळंदी : भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो, भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. तसेच मुस्लिमविरोधी वक्तव्यांवर अजित पवारांनी संताप केला आहे. एखाद्या समाजघटकांविरुद्धची वक्तव्ये खपवून घेणार नाही, असा इशारा देखील अजित पवारांनी दिला आहे. तसेच दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, असे आश्वासन देखील दिले. अजित पवार खेड-आळंदी विधानसभा दौऱ्यावर आहेत. या वेळी ते मेळाव्यात बोलत होते.
अजित पवार म्हणाले,भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो, भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका. महायुतीच्या जागा वाटपात खेड-आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या. ग्रामपंचायत ते आमदारापर्यंत गाडी पोहचली आहे. आता दिव्यापर्यंत गाडी पोहचवण्यासाठी साथ द्या. कार्यसम्राट असणं अन आक्रमक असणं यात फरक आहे. दिलीप मोहिते पाटील हे आक्रमक आहेत.
