#

Advertisement

Thursday, September 5, 2024, September 05, 2024 WIB
Last Updated 2024-09-05T11:22:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुंबईत ठाकरे गटाच्या संभाव्य 22 उमेदवारांची नावं समोर

Advertisement

मुंबई : विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. या जागांपैकी ठाकरे गट 20 ते 22 जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या संभाव्य 22 उमेदवारांची यादी समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाची मुंबईत 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरु आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित यादी संभाव्य आहे. या यादीत विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तसेच नवीन तरुणांनादेखील या यादीत संधी दिली जाताना दिसत आहे. तरुणांना संधी दिलीच पाहिजे आणि जुने जाणते लोकं त्यामध्ये असणं जरुरीचं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

संभाव्य उमेदवारांची यादी

  • वरळी मतदारसंघ – आदित्य ठाकरे
  • दहिसर – तेजस्विनी घोसाळकर
  • वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
  • दिंडोशी – सुनील प्रभू
  • विक्रोळी – सुनील राऊत
  • अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
  • कलिना – संजय पोतनीस
  • कुर्ला – प्रविणा मोरजकर
  • वडाळा – श्रद्धा जाधव
  • जोगेश्वरी- अमोल कीर्तिकर
  • चारकोप – नीरव बारोट
  • गोरेगाव – समीर देसाई
  • भांडूप – रमेश कोरगांवकर
  • चांदिवली – ईश्वर तायडे
  • दादर-माहिम – सचिन अहिर, विशाखा राऊत
  • वर्सोवा – राजू पेडणेकर/ राजूल पटेल
  • शिवडी – अजय चौधरी/ सुधीर सालवी
  • भायखळा – किशोरी पेडणेकर/ जामसुतकर/ रहाटे
  • चेंबूर – अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर
  • अणुशक्तीनगर – विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे
  • घाटकोपर – सुरेश पाटील
  • मागाठाणे – विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी ⁠