#

Advertisement

Thursday, September 5, 2024, September 05, 2024 WIB
Last Updated 2024-09-05T11:14:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एकाच महिलेली किती पदं देणार? रुपाली चाकणकरांनी दिलं उत्तर

Advertisement

पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून रुपाली चाकणकरांना उमेदवारी देण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. चाकणकरांची वर्णी लागणार असल्याच्या वृत्तावरुन पक्षातील पुण्याच्या महिला नेता रुपाली पाटील-ठोंबरेंनी आक्षेप नोंदवत एक नेता एक पद भूमिकेची आठवण करुन देत इतर महिलांचा विचार करण्याची मागणी केली आहे. एकाच महिलेली किती पदं देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या आक्षेपावर आता रुपाली चाकणकरांनी उत्तर दिलं आहे.  विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये माझ्या नावाची चर्चा असल्याचं मला तुमच्याकडून (प्रसारमाध्यमांकडून) समजलं आहे. पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही. त्या पुढचा तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आमच्या प्रवक्त्या राजलक्ष्मी भोसले देतील," असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. पत्रकारांनी, "तुम्हीच त्या बातम्या पेरल्याचा आरोप होत आहे," असं म्हणत प्रश्न विचारला असता रुपाली चाकणकरांनी, "मी सांगितलं ना की आमच्या प्रवक्त्या आणि ज्येष्ठ नेत्या उत्तर देतील. मला वाटत नाही की हे काही उत्तर देण्यासारखे प्रश्न आहेत,"