#

Advertisement

Monday, September 23, 2024, September 23, 2024 WIB
Last Updated 2024-09-23T11:42:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ

Advertisement

मुंबई : राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधन दुप्पट करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही  मंजुरी देण्यात आली आहे. मपंचायती वार्षिक उत्पन्न 75 हजार आहे, त्यांना 10 लाखांपर्यंत करण्यात आले आहे. तेसच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या मानधनमध्ये देखील वाढ करण्यात आली असून ही वाढ 20 टक्के इतकी ही वाढ करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
राज्यातील ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2 हजार ते 8 हजारपर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन 4 हजारवरुन 8 हजार तर उपसरपंचाचे मानधन पंधराशेवरुन 3 हजार रुपये इतके करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन 5 हजारवरुन 10 हजार, तर उपसरपंचाचे मानधन 2 हजारवरुन 4 हजार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मानधनवाढीमुळे राज्यशासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थीक भार येणार आहे.