Advertisement
दिल्ली : ज्येष्ठ माकप नेते सिताराम येच्युरी यांचे निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिनाभरापासून सिताराम येच्युरी यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात होते.
सिताराम येच्युरी यांचा मूळचा जन्म मद्रासमधील आहे. आयुष्यभर त्यांनी कम्युनिष्ट पक्षाचं काम जोमाने केलं. विशेष म्हणजे भारतात कम्युनिष्ट पक्षाच्या वाढीचा आणि पक्षाला उतरती कळा लागण्याचा काळही येच्युरी यांनी पाहिलेला आहे. सध्याच्या काळाच्या त्यांनी केरळमधील सरकारमध्येही महत्वाची भूमिका बजावली होती. सिताराम येच्युरी यांच्या जाण्याने कम्युनिष्ट पक्षाने बुद्धीवादी चेहरा गमावला आहे.
