Advertisement
मुंबई : अजित पवार पक्षाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे थेट दिल्लीतील नेत्यांसोबत याबाबत बोलणार असल्याचं समजत आहे. वादग्रस्त तसंच धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणा-या भाजपा नेत्यांची तक्रार अजित पवार पक्षाचे नेते दिल्लीत करणार आहेत. नितेश राणेंसह काही नेते मुद्दाम मुस्लिम धर्माविषयी वाद निर्णाण होणारी वक्तव्य वारंवार करतात यावरून अजित पवार गटाचे नेते नाराज आहेत. पत्रकार परिषद तसंच भाषणांच्या माध्यमातून भाजपा नेते करत असलेल्या वक्तव्याविरोधात अजित पवार यांच्या पक्षात नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
